मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 19 नोव्हेंबर 2020 (18:51 IST)

आमच्यासोबत २५ वर्षे बोरं चाखली तोच पक्ष शड्डू ठोकत असेल तर आम्ही आव्हान स्वीकारले

ज्यांनी मुंबई महानगरपालिकेत आमच्यासोबत २५ वर्षे बोरं चाखली तोच पक्ष शड्डू ठोकत असेल तर आम्ही आव्हान स्वीकारले, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. राजाचा जीव पोपटात आहे तर मग तुमचा जीव नक्की कशात अडकलाय असा सवाल त्यांनी भाजपला केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वबळावर भाजपचा झेंडा फडकविण्याची घोषणा केली. त्याला शिवसेनेने  जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 
 
दरम्यान, अतुल भातखळकर यांच्यावर मुंबईची जबाबदारी असेल तर मग आशिष शेलार काय करणार?, शेलारांच्या नेतृत्वात मागील निवडणूक लढली होती. त्यांचा अभ्यासही चांगला आहे, मग नेतृत्व बदल का?, मुंबई भाजपत अंतर्गत वाद दिसत आहे, असा टोला महापौर किशोरी पेडणेकर यांनी लगावला.