वाद केल्यामुळे रागाच्या भरात, पतीने पत्नीची हत्या करून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली

Last Modified सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (10:24 IST)
वाद कोणाचे होत नाही पती पत्नी मध्ये वाद होणं देखील साहजिक आहे. पण वाद विकोपाला जाऊ नये ह्याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. अन्यथा त्याचे परिणाम भयंकर होऊ शकतात.असेच काही घडले आहे दौलताबाद येथील तालुका गंगापूर टाकळीवाडी येथे. पती पत्नी मध्ये वाद झाला आणि हा वाद विकोपाला गेला आणि रागाच्या भरात येऊन पती ने पत्नीचा कुऱ्हाड मारून खून करून स्वतः विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाची नोंद दौलताबाद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
चंपालाल तानसिंग बिघोत(55), गंगाबाई चंपालाल बिघोत(48) असे मयत झालेल्या दाम्पत्यांची नावे आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण
चंपालाल आणि त्यांची पत्नी गंगाबाई शनिवारी दररोज प्रमाणे जेवण आटपून शेतात असलेल्या घराच्या ओट्यावर निजले असताना त्यांचामध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद झाले आणि ते वाद विकोपाला गेले. रागाच्या भरात येऊन चंपालाल यांनी गंगाबाईच्या डोक्यात कुऱ्हाडने वार करून खून केला. त्यांची मुलगा घरातच झोपला होता. आईच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आत निजलेल्या मुलाने राहुल ने बाहेर येण्याचा प्रयत्न केला पण दाराला बाहेरून कडी लागलेली असल्याने त्याला बाहेर येता आले नाही. तो मागील दाराने बाहेर येऊन त्यांनी आपल्या आईला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पहिले. त्याने नातेवाईकांच्या मदतीने आईला रुग्णालयात दाखल केले असताच गंगाबाई यांचा मृत्यू झाला. दरम्यान चंपालाल यांनी देखील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळतातच दौलताबाद पोलिसांनी धाव घेत अग्निशमन दलाला कळविण्यात आले आणि अग्निशमन दलाचे अधिकाऱ्यांनी घटनासाठी जाऊन
मयत चंपालाल चे मृतदेह विहिरीतून काढून शवविच्छेदनास पाठवण्यात आले. पोलीस आणि फॉरेन्सिक अधिकारी आणि ठसे तज्ज्ञ यांनीघटनास्थळ वरून गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड आणि रक्ताने माखलेले कपडे जप्त केले. पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली आहे.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

CDS जनरल बिपीन रावत आणि पत्नी मधुलिका यांच्यावर शुक्रवारी ...

CDS जनरल बिपीन रावत आणि पत्नी मधुलिका यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार होणार
देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा तामिळनाडूतील कुन्नूर ...

हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपिन रावत यांच्यासह या ...

हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपिन रावत यांच्यासह या अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला, पहा संपूर्ण यादी
देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत ...

सीडीएस जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचं हेलिकॉप्टर ...

सीडीएस जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचं हेलिकॉप्टर अपघातात निधन,अमेरिका, रशिया  इस्रायल आणि पाकिस्तानी लष्कराकडून ही शोक व्यक्त
भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचं निधन ...

चेन्नई सुपर किंग्जच्या ऋतुराज गायकवाडवर विजय हजारे ...

चेन्नई सुपर किंग्जच्या ऋतुराज गायकवाडवर विजय हजारे ट्रॉफीमध्ये मोठी जबाबदारी
आयपीएल 2021 मध्ये महेंद्रसिंग धोनीची टीम चेन्नई सुपर किंग्जसाठी जोरदार फलंदाजी करणारा ...

IRCTC: आता सर्वांना रेल्वे प्रवासात कन्फर्म सीट पुश ...

IRCTC: आता सर्वांना रेल्वे प्रवासात कन्फर्म सीट पुश नोटिफिकेशन ने मिळणार, काय आहे ते जाणून घ्या
जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर IRCTC तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे. ...