1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 जून 2018 (08:49 IST)

पेरणीच्या तोंडावर खताच्या किंमतीत वाढ

पेरणीच्या तोंडावर खताच्या किंमतीमध्ये वाढ केल्याने शेतकऱ्यांवर अधिकचा बोजा पडणार आहे. तर दुसरीकडे पेट्रोल डीझेल दर रोज वाढत असल्याने नागरिक वैतागले आहेत. त्यामुळे आता शेतकरी वर सुद्धा चांगलाच अडचणीत सापडला आहे. आधीच भाव नाहीत वर हे अश्या किंमती वाढत आहेत.

शेतकऱ्यांना खते खरेदी करताना पोस्ट प्रणालीची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र खताचा व्यवहार पारदर्शक होण्यासाठी आग्रही असलेलं प्रशासन वाढणाऱ्या खताच्या किंमती करण्यास अपयशी ठरले आहे. जाचक अटींमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. अनेकांच्या डोक्यावर अजूनही कर्जाचा बोजा आहे. या परिस्थितीमध्ये पेरणीच्या तोंडावर खताच्या किंमतीमध्ये वाढ केल्याने शेतकरी हतबल
दिसतोय. तर अजूनही हरबरा खरेदी झाली नाही. सत्ता बदल झाला मात्र शेतकरी वर्गाच्या परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही.
खताचा प्रकार          जुना दर    आताचा दर

15 : 15 : 15           887            975

18 : 46 : 0           1076             1258

20 : 20 : 0/13       850              930

10 : 26 : 26          1055            1135

12 : 32 :16           1061            1145

24 : 24 : 0            1015            1110