रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 फेब्रुवारी 2021 (09:46 IST)

शारजाहून येणाऱ्या विमानातील प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरण करणार

नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, नागपूर महापालिकेने आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नागपुरात शारजाहून येणाऱ्या विमानातील प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात (इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन) पाठविण्यात येणार असल्याचे आदेश मनपातर्फे जारी करण्यात आले.
 
आदेशात नमूद केल्यानुसार, शारजा-नागपूर-शारजा हे आंतरराष्ट्रीय विमान १४ फेब्रुवारी, २१ फेब्रुवारी, २८ फेब्रुवारी रोजी नागपूर विमानतळावर येणार असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ अर्थात मिहान इंडिया लि. यांच्याकडून प्राप्त झाली आहे. या माहितीच्या अनुषंगाने पहिले विमान १४ फेब्रुवारी रोजी पहाटे ३.४५ वाजता नागपूर विमानतळावर येणार आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. आणि अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांचे या संपूर्ण कार्यवाहीवर नियंत्रण असेल. याशिवाय गृह विलगीकरण आणि कोविडसंदर्भातील सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक राहील, असे आयुक्त राधाकृष्णन बी. तसेच नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.