मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 सप्टेंबर 2022 (15:14 IST)

पावसाचा जोर कमी झाला मात्र विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट

राज्यात पावसाचा जोर कमी झाला असून मुंबईसह ठाणे परिसरात पावसाने हजेरी लावली. त्यासोबत पालघर, नंदूरबार, औरंगाबाद जिल्ह्यातही पावसाने हजरे लावली. इतर ठिकाणी मात्र, पावसाने उघडीप दिली. हवामान विभागाने आजही राज्यात पावसाचा अंदाज दिला आहे. आज विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांनाही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
 
राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. काही ठिकाणीच हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. मात्र, मुंबई,ठाणे आणि औरंगाबाद परिसरात पावसाचा जोर कायम आहे. मागील तीन ते चार दिवसात राज्यात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कलीत देखील झाल्याचं पाहायला मिळाले. तसेच वाहतुकीवर परिणाम झाला होता.