गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 डिसेंबर 2023 (20:55 IST)

तो आमच्यासाठी आस्थेचा विषय आहे,सचिन अहिर यांची राज्य सरकारवर टीका

Sachin Ahir
राम मंदिर उद्घाटन सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे.  महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेंना आमंत्रण दिलेलं नाही. यावरून ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.
 
“आम्हाला निमंत्रण येवो अथवा न येवो, तो आमच्यासाठी आस्थेचा विषय आहे. इव्हेंट करणारी जी लोक आहेत, त्यांनी त्या काळात पळपुटेपणा केला. ज्यांना लालकृष्ण अडवाणींची आठवण होत नाही, विश्वहिंदू परिषदेचा उल्लेख होत नाही. अशा लोकांकडून आम्ही काय अपेक्षा करायची? असं सचिन अहिर म्हणाले.
 
“राम मंदिर त्यांनी घडवलेलं नाही. राजकीय पक्ष म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी परखड भूमिका मांडली होती. या विषयाला चालना देऊन सांगितलं होतं की लोकसभेत हे बिल आणा. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर हा तिढा सुटलेला आहे. परंतु, आता इव्हेंट करत आहेत, जसं काय यांनीच तिथे जाऊन विटा लावल्या आहेत. आम्हाला अभिमान आहे की राम मंदिर उभं राहतंय. मात्र, आम्हाला आमंत्रण मिळो अथवा न मिळो आम्ही गतवर्षीप्रमाणे तिथे नतमस्तक व्हायला अगोदर जायचो तसं भविष्यात जाणार आहोत”, असं सचिन अहिर यांनी स्पष्ट केलं.
 
Edited By-Ratnadeep Ranshoor