सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

जिग्नेश मेवाणीची सरकारवर टीका

भीमा कोरेगाव हिंसाचारानंतर मला आणि दलित समाजाला जाणूनबुजून लक्ष्य करण्यात येत आहे. हा प्रकार असाच सुरू राहिला तर दलित समाज २०१९ च्या निवडणुकीत तुम्हाला चांगला धडा शिकवेल, अशा इशारा आमदार जिग्नेश मेवाणी यांनी दिला. मला एकदा पंतप्रधानांना भेटायचे आहे. त्यांना भेटायला जाताना मी मनुस्मृती आणि संविधानाची प्रत घेऊन जाईन. या दोन्ही गोष्टी पंतप्रधानांसमोर ठेवल्यानंतर ते मनुस्मृती आणि संविधान यापैकी काय निवडतात, हे मला पाहायचे असल्याचे जिग्नेश यांनी सांगितले.
 
पंतप्रधान मोदी अजूनही भीमा कोरेगावच्या मुद्द्यावर मौन बाळगून का आहेत, असा सवाल त्यांनी विचारला. मोदी पंतप्रधानपदी आल्यापासूनच देशामध्ये दलितांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. त्यांचे गुजरात मॉडेल हे शेतकरी आणि मजुरांना लक्ष्य करणारे असल्याचे त्यांनी म्हटले. सध्या संघ परिवार आणि भाजपाचे लोक बालिश आरोप करून माझी प्रतिमा मलिन करायचा प्रयत्न करत आहेत. गुजरातमधील निकालामुळे हे घडत आहे. त्यामुळे कदाचित त्यांना २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकांची भीती वाटत असावी, असा टोलाही जिग्नेश यांनी सरकारला लगावला.