Karnataka : घटस्फोटित महिलेला फसवून बाळ विकले
घटस्फोटित महिलेला दुसऱ्या लग्नाचे आमिष दाखवून तिची फसवणूक करून तिच्या 1 वर्षाच्या बाळाला विकण्याचा धक्कादायक प्रकार घडला कर्नाटकातील हुबळी येथे घडला असून बीड मध्ये हे प्रकरण समोर आले आहे.
माजलगाव तालुक्यातील गोवर्धन पाटी येथे राहणाऱ्या एका महिलेचे लग्न तीन वर्षांपूर्वी झाले असून तिला एक वर्षाचे मूल आहे. तिचा घटस्फोट झाला असून पती पासून विभक्त ती तिच्या आई वडिलांकडे राहते. महिलेच्या मामाने तिची ओळख छाया नावाच्या महिलेशी करून दिली. तिची चांगली ओळख झाल्यावर 18 सप्टेंबर रोजी छाया महिलेच्या घरी आली आणि तिने सोबत किशोर वासुदेव भोजने नावाच्या व्यक्तीला आणले होते. हा माझा मानलेला भाऊ असे तिने सांगितले. या दोघांनी महिलेला दुसरं लग्न लावून देण्यासाठी तयार केलं. आणि तिच्या मुलाची सोय देखील करण्याची शाश्वती दिली.
त्याच दिवशी ते माजलगावातून कोल्हापूरला जाण्यासाठी निघाले. छायाने आपल्या मुलीला सोबत नेले. कोल्हापूरातून छायाने एका महिलेला फोन केला नंतर त्यांनी बेळगावला भेटण्याचे ठरविले. बेळगावला गेल्यावर ललिता आणि दीपक नावाची व्यक्ती त्यांना न्यायला आली.
नंतर रात्री त्यांनी आपसात चर्चा करून सर्वजण सकाळी कर्नाटकातील हुबळीला गेले तिथे एका चारचाकीतून एका दाम्पत्य आले आणि महिलेच्या इच्छेच्या विरुद्ध जाऊन छायाने मुलाला दाम्पत्याला 50 हजारात विकले. नंतर ते गोव्याला गेले. परत येताना एका पोलीस महिलेला त्यांच्यावर संशय आला. त्यांनी चौकशी केल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. छाया आणि किशोर या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयात सादर केले. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
Edited by - Priya Dixit