मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 12 एप्रिल 2022 (21:50 IST)

किरीट सोमय्या अडचणीत ; आर्थिक गुन्हे शाखेच्या टीमची त्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानी पोहोचली

kirit-somaiya
आय एन एस विक्रांत प्रकरणामुळे सोमय्या पिता-पुत्रांच्या अडचणी वाढल्या आहेत. विक्रांत साठी जमवलेल्या निधीत भ्रष्टाचार करण्याचा आरोप त्यांचा वर करण्यात आला आहे. या प्रकरणी घोटाळा केल्याच्या गुन्हा त्यांच्यावर दाखल केल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेची टीम किरीट सोमय्या यांच्या मुलुंडच्या घरी पोहोचली.अधिकारी घरी पोहोचले त्यावेळी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील हे घरात नव्हते. त्यांच्या घरी आणि कार्यालयात आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून चौकशीसाठी उद्या हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे.  

सोमय्या पिता -पुत्रांवर 'विक्रांतच्या निधीत भ्रष्टाचार केल्याच्या प्रकरणात कोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे आता सोमय्या पिता-पुत्रांवर अटकेची टांगती तलवार आहे. 
 
सोमय्या यांनी एक व्हिडीओ आज शेअर करून ठाकरे सरकारला आव्हान दिले आहे. मी राज्य सरकारच्या घोटाळेबाज मंत्र्यावर शेवट पर्यंत कारवाई करे पर्यंत मी मागे हटणार नाही आणि झुकणार ही नाही मी माझ्यावर लावलेल्या आरोपांची सर्व माहिती उच्च न्यायालयात देणार आहे.