श्री अंबाबाई आणि ज्योतिबा यांचे तासाला फक्त 400 भाविकांनाच दर्शन मिळणार
राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वेगानं वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. अनेक मंदिरांमध्ये दर्शनावरही निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोनामुळे आता बऱ्याच मंदिरांमध्ये दर्शनासाठी ऑनलाइन स्लॉट बुकिंग करूनच दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि ज्योतिबा ऑनलाइन दर्शनाचे वाढत्या कोरोनामुळे कमी करण्यात आले आहेत. तासाला फक्त 400 भाविकांनाच दर्शन मिळणार आहे. देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
कोव्हिडचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर या सर्व गोष्टींचं भाविकांना पालन करणं बंधनकारक असणार आहे. नव्या स्लॉट पद्धतीची आजपासून अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. भाविकांनी गर्दी न करण्याचे देवस्थान समितीकडून भाविकांना आवाहन करण्यात आलं आहे.