1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 डिसेंबर 2020 (17:53 IST)

मी विनोदी आहे की नाही ते जनता ठरवेल; चंद्रकांत पाटील

महाविकास आघाडीचा अजेंडा एक नाही आणि झेंडाही एक नाही आहे. एकमात्र अजेंडा आहे की भाजपला निवडणुकीत वेगळं ठेवणं आहे. एव्हढी भीती त्यांच्या मनात भाजपबद्दल आहे. ते एकत्र आले त्यामुळे आलेले निकाल अनपेक्षित नाहीत. मी त्यांना अनेकदा आव्हान दिलंय की त्यांनी एकट्यानं लढावं, पण ते घाबरतात.
 
ते एकत्र लढतात. तरी देखील आम्ही या पराभवाचं चिंतन करु, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेली आहे. मी विनोदी आहे की नाही ते जनता ठरवेल, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलेलं आहे. सहसा शरद पवार खालच्या लेव्हलची स्टेटमेंट्स करत नाहीत. पण ते असं का करत आहेत, ते माहिती नाही, असं देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलेलं आहे.