1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 ऑक्टोबर 2022 (21:16 IST)

प्रेयसीच्या पतीला पाहताच प्रियकराची तिसऱ्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू

suicide
नाशिक : नाशिक शहरातुन धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका प्रियकराला प्रेमप्रकरण जीवावर बेतलं आहे.
शहरातील म्हसरूळ परिसरात आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेलेल्या प्रियकराला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली.
प्रेयसीच्या घरात गेल्यावर अचानक तिचा पती समोर आला. त्याने दोघांना बघितलं.
आता आपलं बिंग फुटणार या भीतीने प्रियकराने इमारतीच्या थेट तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली उडी मारली.
 
गंभीर जखमी झालेल्या या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हिरावाडी कमलनगर येथे राहणाऱ्या या प्रियकराचा मृत्यू झाला आहे. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.नाशिकच्या हिरावाडी कमलनगरला राहणाऱ्या एका ३६ वर्षीय युवकाचे म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका विवाहित महिलेबरोबर प्रेमसंबंध होते. प्रियकर प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. मात्र त्याचवेळी अचानक तिचा पती दरवाजासमोर आल्याने आपण पकडले जाऊ व आपले बिंग फुटेल या भीतीने त्याने थेट तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली उडी घेतली होती. त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला एका खासगी रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाला.
Edited by : Ratnadeep Ranshoor