Maharashtra Marathi Breaking News Live Today: र्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या 'समिट 2025' च्या निमित्ताने दावोस दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात पैशांचा पाऊस पाडण्यात अभूतपूर्व यश मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात महाराष्ट्राप्रती उद्योजकांमध्ये प्रचंड उत्साह आणि आत्मविश्वास पाहायला मिळत आहे.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....
पुष्पक एक्सप्रेस अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक प्रवासी गंभीर जखमीही झाले आहे. ट्रेनला आग लागल्याची अफवा पसरली होती. यानंतर प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारण्यास सुरुवात केली आणि नंतर त्यांना दुसऱ्या ट्रेनने धडक दिली.
सविस्तर वाचा
महाराष्ट्रातील पुण्यात आरएमसी मिक्सर ट्रक स्कूटरवरून जाणाऱ्या दोन महिलांवर उलटला. यामुळे दोन्ही महिलांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली आहे.
सविस्तर वाचा
शेतकऱ्यांसाठीच्या एक रुपयाच्या पीक विमा योजनेत फक्त दोन ते तीन टक्के अनियमितता झाल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले.
सविस्तर वाचा
महाराष्ट्रातील पुण्यात एका विचित्र आजाराने थैमान घातले आहे. पुण्यात पसरणाऱ्या या आजाराने नवजात बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व लोकांना लक्ष्य केले आहे. आता त्याच्या रुग्णांची संख्या 73 वर पोहोचली आहे.
सविस्तर वाचा
महाराष्ट्रात कार्यकर्ते मनोज जरांगे आजपासून पुन्हा एकदा अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू करणार आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी, ज्यामध्ये ओबीसी अंतर्गत नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण समाविष्ट आहे, ते अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू करतील.
सविस्तर वाचा
शुक्रवारी सकाळी भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत स्फोट झाला, ज्यामध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 10 कर्मचारी गंभीर जखमी झाले आहे.
सविस्तर वाचा
पश्चिम रेल्वेने पुलाच्या पुनर्बांधणीसाठी तीन दिवसांचा मेगाब्लॉक लागू केल्यामुळे मुंबईत रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांना काही दिवस गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे.
सविस्तर वाचा
पश्चिम रेल्वेने पुलाच्या पुनर्बांधणीसाठी तीन दिवसांचा मेगाब्लॉक लागू केल्यामुळे मुंबईत रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांना काही दिवस गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे.
सविस्तर वाचा
मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा याचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी या संदर्भात आदेश जारी केला.
सविस्तर वाचा
महाराष्ट्रात अमित शहा आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे, जिथे ते एकमेकांवर शब्दांनी हल्ला करत आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्या विधानाला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
सविस्तर वाचा
मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यात164 जणांचा मृत्यू झाला, या हल्ल्यात दोषी ठरलेला पाकिस्तानी वंशाचा कॅनेडा उद्योगपति तहव्वूर हुसैन राणा याला आता भारताकडे प्रत्यार्पण केले जाऊ शकते.
युनायटेड स्टेट्स (यूएस) सर्वोच्च न्यायालयाने मुंबई दहशतवादी हल्ल्यातील त्याच्या भूमिकेसाठी दोषी ठरलेल्या तहव्वूर हुसेन राणाची याचिका फेटाळून लावल्याने त्याच्या भारताकडे प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे.या वरुन आता राजकीयचर्चेला उधाण आले आहे.
सविस्तर वाचा....
गोरेगाव पूर्व येथील फर्निचर मार्केटमध्ये शनिवारी भीषण आग लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रहेजा बिल्डिंगमधील खडकपाडा फर्निचर मार्केटमध्ये सकाळी 11.19 वाजता ही आग लागली. मुंबई अग्निशमन दलाच्या म्हणण्यानुसार, आग सकाळी 11:24 वाजता लेव्हल II आणि 11:48 वाजता लेव्हल III वर पोहोचली.
सविस्तर वाचा....
पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या मुलाच्या विरोधात ट्रेफिक सिग्नलवर मोटरसायकल स्वाराला कानशिलात लगवण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सविस्तर वाचा....
महाराष्ट्रात बांगलादेशींच्या बेकायदेशीर घुसखोरीचा मुद्दा अजूनही तापलेला आहे. विशेषत: सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपीही बांगलादेशी असल्याचे उघड झाले आहे. तेव्हापासून तपास सुरू झाला असून बांगलादेशींना बाहेर काढण्यासाठी अनेक ठोस पावले उचलली जात आहेत.
सविस्तर वाचा....
नाशिक ते जयपुर अशी विमानसेवा पुन्हा एकदा सुरु होणार आहे. प्रवाशांना लवकरच या सेवेचा लाभ मिळणार आहे. दोन महिन्यानंतर पुन्हा एकदा विमानसेवा सुरु होणार आहे. या साठी बुकिंग सुरु झाले आहे. हे विमान आठवड्यातून तीन दिवस उड्डाण करणार आहे.
सविस्तर वाचा....
जळगाव सिटी डेअरी फेडरेशनजवळील भाग्यश्री पेट्रोल पंपाजवळ शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या डंपर ट्रकने विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरला धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहेत.
सविस्तर वाचा....
मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. या घटनेच्या भीषणतेने सर्वांवरच भीतीचे सावट पसरले होते. या हल्ल्यात 166 जणांना आपला जीव गमवावा लागला आणि पीडितांच्या कुटुंबीयांच्या आठवणीत ते दिवस आजही ताजे आहेत. अतिरेक्यांनी निरपराध लोकांचा जीव घेतला तेव्हाचे ते भीषण दृश्य लोकांना आज ही विसरता येणे शक्य नाही
मुंबईतील दिंडोशी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका 20 वर्षीय तरुणाने 78 वर्षाच्या महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्या वरुन उघडकीस आला आहे. पीडितेच्या कुटुंबियांच्या जबाबाच्या आधार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
सविस्तर वाचा....
बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांचा चित्रपट 'छावा' रिलीजपूर्वीच चर्चेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी यांच्यावर बनवलेल्या चित्रपटावरून वाद सुरू झाला आहे. चित्रपटाच्या विरोधात आवाज उठवला जात आहे. या चित्रपटाबाबत महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
सविस्तर वाचा....
महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील आयुध कारखान्यात शुक्रवारी भीषण स्फोट झाला. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. आणि 5 जण जखमी झाले. या अपघाताची चौकशी करण्यासाठी उपकामगार आयुक्त (केंद्रीय) नागपुर यांची चौकशी समिती सोमवार पासून चौकशी सुरु करणार आहे.
सविस्तर वाचा....
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या 'समिट 2025' च्या निमित्ताने दावोस दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात पैशांचा पाऊस पाडण्यात अभूतपूर्व यश मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात महाराष्ट्राप्रती उद्योजकांमध्ये प्रचंड उत्साह आणि आत्मविश्वास पाहायला मिळत आहे
सविस्तर वाचा....