दिंडोशित 78 वर्षाच्या महिलेवर 20 वर्षाच्या तरुणाने केला बलात्कार, आरोपीला अटक
मुंबईतील दिंडोशी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका 20 वर्षीय तरुणाने 78 वर्षाच्या महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्या वरुन उघडकीस आला आहे. पीडितेच्या कुटुंबियांच्या जबाबाच्या आधार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वृद्ध महिला घरात एकटीच राहत होती. घरात सीसीटीव्ही केमेरा बसवण्यात आला आहे.कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, महिलेला स्मृतिभृंश आणि स्मरणशक्ति कमी झाली आहे. ती घरात एकटीच असायची झोपलेली असताना आरोपीने घरात शिरुन तिच्यावर बलात्कार केला आणि पसार झाला.
Edited By - Priya Dixit