गुरूवार, 3 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

दहावीचा निकाल या दिवशी लागणार

exam result
Maharashtra SSC Result 2023 महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. सूत्रांप्रमाणे महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल एक ते दोन दिवसांत जाहीर होईल.
 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ SSC म्हणजेच 10वी परीक्षेचा निकाल mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केला जाणार आहे. 
 
बोर्डाच्या वेबसाइट व्यतिरिक्त विद्यार्थी एसएमएस आणि डिजीलॉकरवरही निकाल पाहू शकतात.
 
महाराष्ट्र बोर्ड 10वीची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च दरम्यान घेण्यात आली अ सून या वर्षी बोर्डाच्या परीक्षेला सुमारे 32 लाख विद्यार्थी बसले होते.
 
या प्रकारे बघता येईल महाराष्ट्र एसएससी 10वी निकाल 2023
महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.  mahahsscboard.in किंवा mahresult.nic.in यावर भेट द्या.
त्यानंतर 10वीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
यानंतर रोल नंबर आणि आईचे नाव भरून सबमिट बटणावर क्लिक करा.
विद्यार्थी त्यांचा निकाल तपासू शकतात आणि डाउनलोड देखील करू शकतात.