राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये स्थापन होणार
राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये नव्याने वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. यामध्ये 12 पैकी 6 जिल्हे हे विदर्भातील असून बाकी 6 उर्वरित विभागातील आहेत.
वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील गडचिरोली, वाशिम, बुलडाणा, भंडारा, अमरावती आणि वर्धा या 6 जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी केली जाणार आहे. त्यानंतर मराठवाड्यातील हिंगोली आणि जालनामधे नवे वैद्यकीय महाविद्यालय उभे राहील. त्यानंतर मुंबई उपनगर, ठाणेआणि पालघर, तर अहमदनगरचा समावेश आहे.