बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 ऑगस्ट 2022 (21:06 IST)

ही मोदी पर्व संपल्याचीच ही नांदी आणि कबुली : उद्धव ठाकरे

uddhav thackeray
देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या नावाने मतं मागणे ही मोदी पर्व संपल्याचीच ही नांदी आणि कबुली आहे. भाजपच्या धोरणानुसार वापर संपला की नवी नाव शोधायचे आणि त्या नावाने मते मागयची आणि आपली सत्तेची तळी भरायची असाच हा प्रकार आहे. या निमित्ताने भाजपचा खरा चेहरा देवेंद्र फडणवीसांनी समोर आणला. महाराष्ट्रातील जनता यांना मतपेटीतून उत्तर देईल, अशी टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी केली.याबाबत प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले आहे.
 
देंवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत भाषण करताना आपल्याला बाळासाहेबांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेत सत्ता मिळवायची आहे, असे आवाहन केले होते. यावर शिवसेना पक्ष प्रमुखे उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे म्हणजे मोदी पर्व संपत आल्याची नांदी असल्याची बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी केली.