बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 25 एप्रिल 2022 (08:41 IST)

अहमदनगरच्या दौऱ्यावर आलेले आमदार अडकले हॉटेलच्या बाथरुममध्ये !

bathroom door
विधिमंडळाची विमुक्त जाती-भटक्या जमातींच्या योजनांचा आढावा घेण्यासाठीची समिती नगर जिल्ह्यात आली खरी मात्र त्यांना येथे उपेक्षा आणि हालअपेष्टांनाच सामोरे जावे लागले.

समितीचे सदस्य असलेले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनाला किरकोळ अपघात झाला. तर दुसरे सद्स्य आमदार रत्नाकर गुट्टे सुमारे अर्धा तास हॉटेलच्या स्वच्छतागृहात अडकून पडले होते.
समितीच्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी सुमारे पंधरा लाख रुपयांचा खर्च झाला. मात्र, समितीचे समाधान झालेच नाही. हवी ती माहिती मिळाली नसल्याने प्रशासनाचा निषेध करून समिती निघून गेली.

आता मुंबईत बैठक होणार आहे. या दौऱ्यात विचित्र घटना घडल्याची माहिती आमदार पडळकर यांनीच नंतर पत्रकारांना दिली. समितीचे सदस्य आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या निवासाची व्यवस्था एका खाजगी हॉटेलमध्ये करण्यात आली होती.

तेथे बाथरूमचा दरवाजा खराब होता. सकाळी अंघोळीसाठी गेले असताना दरवाजा घट्ट बसला. सुमारे अर्धातास ते आतमध्ये अडकडून पडले होते.पडळकर यांचे वाहन अपघातातून थोडक्यात बचावले. समितीचा दौरा प्रशासनाने गांभीर्याने घेतला नाही, असा आरोप करून समिती निघून गेली.