मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 मे 2019 (09:56 IST)

नमो शपथ विधी आणि पुण्यात मोफत चहा

पुणेकर करतात ते नेहमीच असे वेगळे असते, यावेळी सुद्धा पुन्हा त्यांनी चहा सोबत एक हटके प्रकार केला आहे. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा राष्ट्रपतीभवन येथे पार पडत होता, तेव्हा नमो अमृततुल्यकडून पुणेकरांना मोफत चहा वाटण्यात आला. संध्याकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत हा मोफत चहा देण्यात आला. यावेळी शेकडो पुणेकरांनी चहाचा लाभ घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. मोदी पुन्हा पंतप्रधान होणार या आनंदात भाजपाच्याकार्यकर्त्यांनी विविध उपक्रमाचे देशात आयोजन केले, कोणी लाडू वाटले तर कोणी देवाला प्रसाद वाहिला. पुण्यात अनेक ठिकाणी सत्यनारायण पुजा आयोजित  करण्यात आली होती. तर काही ठिकाणी मिठाई वाटण्यात आली. पुण्यातील सदाशिव पेठेत सुरु करण्यात आलेल्या नमो अमृततुल्य येथे मोदींच्या शपथविधी निमित्त मोफत चहाचे वाटप केले आहे. विशेष म्हणजे मोदींकडून प्रेरणा घेऊनच हे नमो अमृततुल्य सुरु करण्यात आले असून, या चहाच्या दुकाना शेजारी एक स्टेज उभारुन तेथे मोदींची  प्रतिमा आणि ते भाषण करत असल्याचा देखावा उभारण्यात आला होता. त्याचबरोबर साऊंडवर मोदींची विविध भाषणे लावण्यात आली होती. त्यामुळे एका बाजूला नरेद्र मोदी यांचा शपथ विधी तर दुसरीकडे उत्तम चहा असे चित्र होते.