रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 मार्च 2017 (16:54 IST)

नाशिक महापौर पदाची निवड १४ मार्चला

नाशिकच्या महापौर पदाची निवड येत्या १४ मार्चला होणार आहे. यासाठी पिठासन अधिकारी म्हणून नाशिकचे जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिकमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत असल्यामुळे महापौर पदाची खुर्ची भाजपच्याच उमेदवाराकडे असणार आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या महापौर पदासाठी पंचवटी विभागातून चार नगरसेवक  असले तरी योग्य निकषांच्या आधारावर महापौर म्हणून कुणाही एकास संधी मिळण्याची शक्यता आहे. नाशिककरांनी एकहाती सत्ता दिल्याने भाजपची जबाबदारी वाढली असून या काळात नाशिकचा सर्वांगीण विकास नागरिकांना अपेक्षित राहणार आहे. त्यामुळे पक्षाला महापौर पदाचा दावेदार निश्चित करताना पक्षासाठी दिलेले योगदान, ज्येष्ठत्व, कामाचा दांडगा अनुभव अशा सर्व निकषांचा विचार होण्याची शक्यता आहे. पाच वर्षांच्या कार्यकाळात जास्तीत जास्त नगरसेवकांना विविध पदांवर काम करण्याची संधी मिळावी यासाठी पक्षाकडून प्रयत्न केले जाण्याची शक्यता असल्याने अडीच वर्षांसाठी असलेले महापौर पद हे पक्षीय स्तरावर सव्वा वर्षासाठी करण्याचादेखील भाजपकडून निर्णय होण्याची शक्यता आहे.