रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 एप्रिल 2022 (10:52 IST)

नाशिक पोलीस आयुक्तांचा इशारा; 3 मे पर्यंत सर्व प्रार्थना स्थळावरील भोंगे काढा, अन्यथा ..

सध्या राज्यात मशिदीवरील भोंग्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. आता नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी दीपक पांडे यांनी दिलेल्या आदेशावरून राज्यभरात त्याची चर्चा सुरु आहे. त्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, नाशिकात मशिदीतच नव्हे  तर सर्व धार्मिक स्थळावरील भोंगे लावण्यासाठी आवश्यक परवानगी घ्यावी लागणार आहे. असे केले नाहीस तर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाणार. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिलेल्या आदेशानुसार, मशिदीच्या 100 मीटरच्या परिसरात हनुमान चालीसा म्हण्याची परवानगी नाही. या परिसरात हनुमान चालीसा लावण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार. 
 
पोलीस आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार, ध्वनीक्षेपका बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात येणार आहे. त्यानुसार आवाजाची पातळी ठरवण्यात आली आहे. त्या आवाजाच्या पातळीनुसारच धार्मिक स्थळांवर आवाजाची पातळी ठेवण्यात येईल. या व्यतिरिक्त त्यांनी नाशिकात जातीय तेढ निर्माण करू नये असा इशारा देखील दिला आहे