शनिवार, 5 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 जुलै 2023 (21:20 IST)

नाशिक - पाण्याच्या टाकीत आढळला युवकाचा मृतदेह

death
अंबड भागातील वनश्री कॉलनी येथे राहत्या घरातील छतावरील पाण्याच्या टाकीत युवकाचा मृतदेह आढळला आहे. मयत व्यक्तीचे नाव भूषण भारंबे (४१)आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.  
 
सविस्तर माहितीनुसार, दुपारी साडेतीनच्या सुमारास भूषण घरात दिसत नसल्याने घरातील कुटुंबीय छतावर गेले असता, त्यांना पाण्याच्या टाकीत भूषणचा मृतदेह आढळला. यावेळी भूषणची पत्नी नोकरीवर गेलेली होती. तर आईवडील घरात होते.
 
भूषण यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संतोष संगम करत आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor