1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020 (08:41 IST)

काहीही झाले तरी वाढीव वीजबिल भरू नका, राज यांचे जनतेला आवाहन

काहीही झाले तरी वाढीव वीजबिल भरू नका, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना केले आहे. दरम्यान, वाढीव वीजबिलांविरोधात मनसेचा एल्गार पुकारला होता. राज्यात अनेक जिल्ह्यांत मोर्चे काढून निषेध नोंदवला. वीज बिल माफ करा, अशी मागणी यावेळी मनसेने केली. सोबतच ही संघर्षाची वेळ नाही, सरकारने भान ठेवावे, असा इशाराही राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
 
पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेला वीज बिल भरू नका असे आवाहन केले आहे. जर वीज कनेक्शन कापायला कोणी आले तर संघर्ष हा महाराष्ट्र सैनिकांसोबत होणार आहे, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.