शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 ऑक्टोबर 2020 (11:12 IST)

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून

तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून सूरू होणार आहेत. याबाबतीत पुढील परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी ही माहिती दिली आहे. परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सुधारीत वेळापत्रकानुसार परीक्षा घेतांना संभाव्य तांत्रिक अडचणी उद्भवणार नाहीत तसेच यासाठी पर्यायी व्यवस्थाही तयार केली जाणार असून विद्यार्थ्यांनी कोणतीही काळजी करू नये असेही संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.
 
मुंबई विद्यापीठाच्या दूर शिक्षण संस्था व मुक्त अध्ययन संस्थेच्या तृतीय वर्ष बीकॉम आणि बीएच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षेच्या सर्व्हरवर साय अटॅकने तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने ६ आणि ७ ऑक्टोबरपासून होणारे परीक्षेचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत.