शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 नोव्हेंबर 2022 (08:29 IST)

संजय राऊत यांना 18 नोव्हेंबरला ED कार्यालयात हजर राहण्यासाठी नोटीस

sanjay raut
अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेना खासदार संजय राऊत यांना पुन्हा एकदा नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली आहे. संजय राऊत यांनी चौकशीसाठी 18 नोव्हेंबरला ED कार्यालयात हजर व्हावं, असं या नोटिशीमध्ये म्हटलं आहे.
 
ED कडून दाखल असलेल्या पत्राचाळ गैरव्यवहाराच्या आरोपांखाली संजय राऊत यांना 100 दिवसांपेक्षा जास्त काळ जेलमध्ये राहायला लागलं होतं. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांची जामिनावर सुटका झाली होती.
 
दरम्यान ED ने चौकशीसाठी पुन्हा बोलावलं आहे. तर यासोबतच त्यांनी संजय राऊतांच्या जामिनाविरोधात सुधारित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी सदर याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या याचिकेवर 25 नोव्हेंबरला सुनावणी होईल.