गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 7 जानेवारी 2019 (08:48 IST)

अन्यथा मराठी नाटक बुडेल : राज ठाकरे

टीव्हीवरील मालिकांनी आपला स्वतंत्र प्रेक्षक वर्ग तयार केला आहे तसा वर्ग मराठी नाट्यनिर्मात्यांनी निर्माण करणे गरजेचे आहे. आशयाबरोबरच सादरीकरणात देखील योग्य तो बदल केल्यास नाटकांकरिता प्रेक्षक तयार होईल. अन्यथा मराठी नाटक बुडाले अशी म्हणण्याची वेळ मराठी नाट्यनिर्मात्यावर आल्याशिवाय राहणार नाही, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.थर्ड बेल एंटरटेनमेंट च्यावतीने कलातीर्थ पुरस्कार, निर्मिती गौरव पुरस्काराच्या वितरण सोहळ्यात ठाकरे बोलत होते. 
 
 मराठी नाटके आणि नाट्यनिर्माते याविषयी राज म्हणाले, मराठी नाटक आता बदलणे गरजेचे आहे. जुने -नवे वाद टाळून नाटकांकडे प्रेक्षक कसा येईल याचा विचार निर्मात्यांनी करावा. आता पूर्वीचा प्रेक्षक राहिला नाही. ही सगळी परिस्थिती समजावून घेताना चॅनेलवरच्या गोष्टी सोडून मराठी नाटक करावे लागेल. अन्यथा मराठी नाटक बुडण्याची वेळ आली असे म्हणण्याची वेळ निर्मात्यांवर येईल.