1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (17:40 IST)

उद्धव ठाकरेंना सध्या डिस्चार्ज नाही, शस्त्रक्रियेनंतर फिजिओथेरपी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची या महिन्याच्या सुरुवातीला येथील एचएन रिलायन्स रुग्णालयात यशस्वी 'सर्व्हाइकल स्पाइन सर्जरी'नंतर फिजिओथेरपी करण्यात आली. मुख्यमंत्री कार्यालयाने सोमवारी ही माहिती दिली. 
सोमवारी, मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) सांगितले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती सध्या “अत्यंत स्थिर” आहे आणि त्यांना योग्य वेळी रुग्णालयातून सोडण्यात येईल. सीएमओने एका निवेदनात म्हटले आहे की, "मुख्यमंत्र्यांवर मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे आणि एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये त्यांची फिजिओथेरपी सुरू आहे. 
 
त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना योग्य वेळी डिस्चार्ज देण्यात येईल, असे सीएमओने सांगितले. तत्पूर्वी रविवारी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी राजनाथ सिंह यांनी ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
 
विशेष म्हणजे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पाठीच्या कण्यामध्ये रक्ताची गुठळी निर्माण झाल्याने डॉक्टरांना पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करावी लागली. जेणेकरून रक्ताच्या गुठळ्या काढता येतील. सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या 18 व्या मजल्यावरील विशेष ऑपरेशन थिएटरमध्ये गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. शिवसेनाप्रमुखांच्या मणक्याचे सर्जन डॉ.शेखर भोजराज आणि हृदयरोग तज्ज्ञ डॉ.अजित देसाई यांच्या नेतृत्वाखाली त्यांची नवीन शस्त्रक्रिया करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अनेक दिवसांपासून मान आणि पाठदुखीने त्रस्त होते.