धनंजय मुंडे प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता : चित्रा वाघ
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर भाजप आक्रमक झालेले आहे. भाजप महिला मोर्चाकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन करण्यात आले आहे. यानंतर पत्रकार परिषद घेत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणात पीडितावर दबाव येण्याची शक्यता आहे, तसेच पुराव्यांशी देखील छेडछाड होण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे.
पोलीस तपासानंतर सत्य समोर येईल, मात्र अद्याप एफआयआर दाखल झालेली नाही. या सर्व गोष्टी गुंतागुंतीच्या आणि संशयास्पद असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. जर रेणू शर्मा दोषी असेल तर तिला शिक्षा व्हावी किंवा धनंजय मुंडेंसह ज्यांनी आरोप केले आहेत, ते दोषी असतील तर त्यांना शिक्षा व्हावी. पीडित महिला आणि तिच्या कुटुंबावर दबाव येण्याची शक्यता आहे. तसेच या प्रकरणात पुराव्यांशी देखील छेडछाड होऊ शकते, अशी शक्यता चित्रा वाघ यांनी व्यक्त केलेली आहे.