रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019 (12:46 IST)

शिवसेनेच्या हातात आता सत्तेचा जोकर

राज्यात सत्तेचं काय होईल, हे अजून तरी सांगता येत नाही. मात्र या सत्तेचा जोकर शिवसेनेच्या हातात आहे, असा विश्वास शिवसेनेचे उपनेते आणि माजी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे. एका कुटुंबातील विवाह सोहळ्याप्रसंगी गुलाबराव पाटील जळगाव येथे यांनी हा विश्वास व्यक्त केला.
 
“राज्यात सत्तेचं काय होईल, हे सांगता येत नाही. परंतु सत्तेचा जोकर शिवसेनेच्या हातात आहे. शिवसेना ठरवेल तेच होईल”, असं गुलाबराव पाटील म्हणाले. ते पुढे म्हणाले की “शरद पवार काय करतील यावर सर्व  अवलंबून असून, परंतु काहीही असले तरी आमच्या हातात ‘जोकर’ आहे. आम्ही ठरवलं तेच होणार, मी मंत्री होवो न होवो. जरी केवळ आमदार राहिलो तरी मंत्र्याकडे जाऊन सर्वसामान्य जनतेचे काम करण्याची धमक आपल्यात आहे”, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.