शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जुलै 2022 (15:37 IST)

सत्तेची भांग पिणारे उद्या ‘मातोश्री’वर कब्जा करतील- संजय राऊत

sanjay raut
शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर टीका, आरोप करण्याचे सत्र सुरु झाले ते अद्यापही संपले नाही. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर सडकून टीका केली आहे.  
 
नशेची, सत्तेची, बेईमानीची भांग पिणारे उद्या मातोश्री आमचे आहे असाही दावा करु शकतात, अशी टीका शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांवर केली आहे. उद्या कदाचित बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केलेलीच नाही असेही म्हणू शकतात. यांची वैचारिक पातळी इथपर्यंत गेली आहे की, शिवसेना आणि बाळासाहेबांचा संबंध नाही असेही वक्तव्य केले जाऊ शकते, अशा शब्दांत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे.
 
महाराष्ट्रातील काही खासदारांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. ५० आमदारांच्या घरानंतर आता खासदारांनाही सुरक्षा दिली आहे. पोलीस बळाचा, केंद्रीय यंत्रणांचा, पैशांचा वापर होत आहे, ब्लॅकमेलिंग केलं जात आहे, पण आम्ही जे होईल ते पाहून घेऊ. कोणत्याही परिस्थितीशी संघर्ष करण्यासाठी, लढा देण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तयार आहे, असा निर्धार संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.