गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 सप्टेंबर 2018 (17:18 IST)

राज यांनी दिला आजोबांच्या आठवणींना उजाळा

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख नेते, पत्रकार, समाजसुधारक, वक्ते केशव ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची आज जयंती आहे. यानिमित्ताने त्यांचे नातू आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटवरुन एक फोटो ट्विट करुन त्यांच्या स्मृती विनम्र अभिवादन केले आहे.
 
प्रबोधनकारांचा फोटो ट्विट करुन राज यांनी आपल्या आजोबांच्या आठवणींना उजाळा दिला. या ट्विटमध्ये राज म्हणतात, ‘अन्याय्य रूढी, जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी लेखन, वक्तृत्व आणि प्रत्यक्ष कृती ह्यांचा मेळ घालणारे, आमचे आजोबा स्व. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे ह्यांची आज जयंती. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.’ राज यांच्या या ट्विटवर अनेकांनी रिप्लाय करुन प्रबोधनकारांना अभिवादन केले आहे.