शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 मे 2021 (07:29 IST)

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची पुनर्रचना; डॉ. श्रीधर तथा राजा दीक्षित यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर डॉ. श्रीधर तथा राजा दीक्षित यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली असून व 30 सदस्यांची पुढ़ील तीन वर्षाच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नियुक्त सदस्यांचे मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी अभिनंदन केले आहे.
 
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर विविध क्षेत्राशी निगडीत अध्यक्ष व 30 सदस्य अशा एकूण 31 सदस्यांची दि. 05.03.2019 च्या शासन निर्णयान्वये तीन वर्षाच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत नियुक्ती करण्यात आली होती. या मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी राजीनामा दिल्यानंतर, त्यांचा राजीनामा दि. 30.07.2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये स्वीकृत केला आहे. त्या अनुषंगाने मंडळाची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
 
या समितीत  पुढील प्रमाणे सदस्यांची नियुक्ती झाली आहे.
 
डॉ. श्रीधर तथा राजा दीक्षित – अध्यक्ष, डॉ.भीमराव उल्मेक, डॉ. श्रीनंद बापट, डॉ.अरुण भोसले,  राहुल देशमुख, डॉ. प्रभाकर देव, श्री. सतीश आळेकर, हेमंत राजोपाध्ये,  सुबोध जावडेकर,  आसाराम लोमटे, डॉ. रवींद्र रुक्मिणी रविंद्रनाथ, निखिलेश चित्रे,डॉ. प्रकाश पवार, श्रीमती शर्मिला फडके, डॉ. प्राची देशपांडे,श्रीमती प्राची दुबळे, डॉ. सदाशिव पाटील, प्रा. संजय ठिगळे, डॉ. कृष्णदेव गिरी, डॉ. विशाल इंगोले, डॉ. निंबा देवराव नांद्रे, प्रा. संतोष पवार, श्रीमती मनिषा उगले, भाऊसाहेब चासकर, उल्हास पाटील,
 
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 202105271503243033 असा आहे.