1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 डिसेंबर 2020 (08:39 IST)

'म्हणून' रानगव्याचा झाला मृत्यू, वनविभागाने दिली माहिती

rangavyas death
पुण्यात पकडलेल्या रानगव्याचा मृत्यू झाला. यानंतर प्राणी प्रेमी संघटनांनी रोष व्यक्त केलाय. रानगव्याला बेशुद्ध करण्यासाठी तीन वेळा इंजेक्शन देण्यात आले होते. रानगव्याच्या तोंडाला आणि पायाला लागलं होतं. या कारणांमुळे मृत्यू झाल्याचे वनविभागाने म्हटले आहे. 
 
आपण त्याच्या जंगलात अतिक्रमण केलंय. मानवी वस्तीत तो येणं स्वाभाविक आहे असं पुण्यातील उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी म्हटलंय. रेस्क्यू झाल्यानंतर गव्याच्या शरीरातील उष्णता कमी वाढली. सलग खूप काही पळाल्यामुळे तो थकला होता असे ते म्हणाले.घटनास्थळी प्राण्यांचे डॉक्टरही होते. दोनदा भूल देण्याचा प्रयत्न केला. भुलीच्या इंजेक्शनचा ओव्हर डोस वैगरे काही झालं नसल्याचे ते म्हणाले. नागरिकांनी गर्दी केली, त्यांनी सहकार्य करायला हवं होतं असं  पाटील यांनी सांगितल.