शुक्रवार, 27 जानेवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

वाचा, तंत्रशिक्षण विभागातील महत्वपूर्ण निर्णय

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातील तंत्रशिक्षण विभागातील शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता प्रवेश घेणाऱ्या पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना ज्या उमेदवारांनी EWS,NCL व CVC प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी पावती सादर केली होती.अशा सर्व उमेदवारांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत त्या-त्या संबंधित प्रवर्गातून जागा वाटप करण्यात येईल, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे. 
 
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणे हा प्रवेश तात्पुरता म्हणून ग्राह्य धरण्यात येणार असून संबंधित अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया संपण्याच्या अंतिम तारखेच्या आत संबंधित उमेदवारांनी मुळ प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक असल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.