सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 एप्रिल 2017 (10:11 IST)

येत्या 15 एप्रिलपासून संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा

विरोधी पक्षांच्या संयुक्त संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा 15 एप्रिलपासून राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ सिंदखेड राजा येथून सुरु होणार आहे. माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांनी याबबात माहिती दिली.  

या यात्रेच्या तयारीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, समाजवादी पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांची बैठक विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी पार पडली. दुस-या टप्प्यात संघर्ष यात्रा बुलडाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, आणि पालघर जिल्ह्यातून जाणार आहे. लवकरच यात्रेच्या दुस-या टप्प्याचा कार्यक्रम जाहीर केला जाईल असं चव्हाण म्हणाले.