1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 (15:55 IST)

वाईन विक्रीवर सयाजी शिंदेंनी असे मिश्कील भाष्य केले

राज्यातील मोठया सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीचा निर्णयावर अभिनेते सयाजी शिंदे यांनी मत व्यक्त केलंय. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रोपळे येथे सह्याद्री देवराई लोकार्पण सोहळा  सयाजी शिंदेंच्या हस्ते पार पडला. या सोहळ्यानंतर त्यांना वाईन विक्रीसंदर्भातील प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता त्यांनी यावर मिश्कील भाष्य केलं आहे.
 
कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वृक्षारोपण आणि इतर विषयांवर चर्चा करुन झाल्यानंतर अचानक एका पत्रकारने सयाजी शिंदेंना वाइन विक्रीसंदर्भातील प्रश्न विचारला. त्यावर आधी प्रश्न ऐकून सयाजी शिंदे हसले. त्यानंतर त्यांनी चांगल्या वाईट गोष्टींचं ज्ञान आपलं आपल्याला हवं असं मत व्यक्त केलं.
 
या प्रश्नाला उत्तर देताना सयाजी शिंदेंनी, “जगात चांगल्या वाईट सगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात. कोंबडीला सांगता येत नाही की दगड खा अन् माती खा. माणसाला कळलं पाहिजे ना दगड खायचे की माती खायची. त्यामुळं कोंबडीएवढं ज्ञान असलं तरी पुरे झालं,” असं म्हटलं. सयाजी शिंदेंनी दिलेलं उदाहरण आणि प्रतिक्रिया ऐकून उपस्थितांना एकच हसू फुटलं.