सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 (15:45 IST)

दुभत्या जनावरांना या रोगाची लागण सहा गायी दगावल्या ..! ‘त्या ‘तालुक्यातील शेतकरी भयभीत

संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये दुभत्या जनावरांना लाळ्या, खुरकत या रोगाने ग्रासले आहे. अनेक दुभत्या जनावरांना या रोगाची लागण झाली असून लसीकरणाअभावी जनावरांचे मृत्यू होत असल्याचा प्रकार घडत आहेत. जनावरांना लाळ्या, खुरकत रोगाची लागण हिवाळ्याच्या सुरुवातीला होते.
 
याची माहिती शासन, प्रशासनाला असताना देखील खबरदारीच्या उपाययोजना म्हणून जनावरांचे लसीकरण केले नसल्यामुळे जनावरांचे मृत्यू होत आहेत. जनावरांच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केला जात आहे. लाळ्या, खुरकूत रोगाची लागण होऊन अंभोरे गावातील नवनाथ कोटकर यांच्या मागील पाच दिवसांत सहा गायी दगावल्या असून त्यांचे सुमारे दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दुभत्या जनावरांच्या मृत्युनंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. मृत जनावरांचे शवविच्छेदन केल्यानंतर प्राथमिक तपासणी अहवालात लाळ्या खुरकत रोग झाल्याचे समोर आले आहे.