गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (14:57 IST)

विदर्भातून युवा सेनेच्या सात जिल्हाप्रमुखांचा शिंदे गटात प्रवेश

eknath shinde
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर शिवसेनेतील अनेक ज्येष्ठ, निष्ठावंत सैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेला खिंडार पडले. आता पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विदर्भातून युवा सेनेच्या सात जिल्हाप्रमुखांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. एकीकडे महापालिका निवडणुकीचा धुराळा उडाला असताना दुसरीकडे अशाप्रकारे पक्षप्रवेश होत असल्याने ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
 
विदर्भातील वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीतील युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. किरण पांडव हे मुख्यमंत्र्यांचे विश्वासू मानले जातात, त्यांच्याच प्रयत्नांनी युवासेनेत खिंडार पाडण्यास यश मिळाले आहे. हे सातही युवासेना जिल्हाप्रमुख माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि वरूण सरदेसाई यांच्या विश्वासातील सहकारी होते.
Edited by : Ratnadeep Ranshoor