चिखलदरा मध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
Chikhaldara News: महाराष्ट्रातील चिखलदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका तरुणाने अल्पवयीन मुलीला प्रेमाचे आमिष दाखवून व लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली. तिने मुलाला जन्म दिला. ती अल्पवयीन असल्याचे समोर आल्यावर तिच्या 22 वर्षीय प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखलदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या 17 वर्षीय पीडित तरुणीला 22 वर्षीय आरोपी तरुणाने आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तसेच नंतर लग्नाचे आमिष दाखवून 8 महिने तिच्या घरी जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतरपोटदुखीच्या तक्रारीनंतर अल्पवयीन मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आई व मूल अल्पवयीन असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास येताच चिखलदरा पोलिसांना ही माहिती देण्यात आली. याप्रकरणी 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून चिखलदरा पोलिसांनी 22 वर्षीय प्रियकरावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.