1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 30 ऑगस्ट 2021 (16:28 IST)

धक्कादायक : ५ वर्षीय चिमुकलीवर अल्पवयीन मुलाचा अत्याचार

Shocking: 5 year old Chimukali tortured by a minor boy
खेळण्याच्या बहाण्याने पाच वर्षीय मुलीवर १५ वर्षीय मुलाने चार ते पाच वेळा अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन  पंधरा वर्षीय मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले.
 
शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १५ वर्षीय मुलाने त्याच्या घरासमोरच्या पाच वर्षीय मुलीवर अत्याचार केला. हा प्रकार पीडितेने भावाला सांगितल्यानंतर वडिलांनी विचारपूस केली असता तिने झाल्याप्रकाराची माहिती दिली. यावरून कुटुंबीयांनी संशयिताला घरी जाऊन जाब विचारला असता त्याने तसेच त्याच्या कुटुंबीयांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे वडिलांनी पीडितेला घेऊन शनिपेठ पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली.
 
शनीपेठ पोलिसात याप्रकरणी संशयित मुलाविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी  मुलाला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली आहे.