गुरूवार, 21 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 ऑक्टोबर 2021 (16:25 IST)

लक्झरी बसमधून सहा किलो चरस जप्त; राजगड पोलिसांची कारवाई

मुंबईहून गोव्याला निघालेल्या लक्झरी बसमधून राजगड पोलिसांनी  पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर शुक्रवारी पहाटे सुमारे बत्तीस लाख रुपये किमतीचा सहा किलो चरस कारवाई करत जप्त केला आहे.

याप्रकरणी एका आरोपीस ताब्यात घेतले असून राजगड पोलिसांची याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे. या कारवाईबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई ते गोवा या मार्गावर धावणाऱ्या डॉल्फिन ट्रॅव्हल्स मधून एक व्यक्ती चरस घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हा व्यक्ती पुण्याहून गोव्याला जात होता.

त्यानुसार राजगड पोलिसांनी आज पहाटेच्या सुमारास खेड-शिवापूर टोल नाक्यावर ट्रॅव्हल्स अडवून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 6 किलो अंमली पदार्थ जप्त केल्याची माहिती भोर उपविभागाचे एसडीपीओ धनंजय पाटील यांनी दिली आहे.