सोलापुरात खेळता खेळता चिमुरड्यांचा मृत्यू
सोलापुरात मोहोळ तालुक्यात शेततळ्यात पडून तीन मुलांचा पाण्यात गुदमरुन त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे या तीन चिमुरड्यांच्या कुटुंयिांवर दु:खाचा डोंगर पसरला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
विनायक भरत निकम, सिद्धेश्वर भरत निकम, हे दोघे सख्खे भाऊ खेळता खेळता शेततळ्यात बुडाले. यावेळी त्यांच्यासोबत कार्तिक मुकेश हिंगमिरे हा देखील खेळत होता. त्याच्याही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
घटनेच्या दिवशी आई वडिल मजुरीसाठी गेल्यानंतर तिघेही खेळत होतं. यानंतर सोमवारी दुपारी तिघेही शेततळ्याकडे पोहायला गेले. यावेळी पाय घसरुन तिघेही पाण्यात पडले आणि त्यांच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. मजुरीवरून जेव्हा आई वडिल घरी परतले, तेव्हा मुलं कुठंच दिसत नाही म्हणून त्यांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली असता त्यांचा शेततळ्यात मृतदेह आढळून आले.