शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 डिसेंबर 2018 (09:40 IST)

लवकरच 35 लाख कापडी पिशव्या बाजारात येणार

प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून लवकरच 35 लाख कापडी पिशव्या बाजारात आणण्यात येणार असल्याचे, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले.
 
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात वर्तमानातील प्रदूषण आव्हान आणि उपाययोजना या विषयावरील चर्चासत्राचे उद्घाटन पर्यावरण मंत्री कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी देशातील बरीच राज्ये महाराष्ट्राचा प्लास्टिकबंदीचा पॅटर्न राबविण्यासाठी पुढे आलेली आहेत. प्लास्टिक पिशव्यांना पर्याय देण्यासाठी लवकरच 35 लाख कापडी पिशव्या बाजारात येणार आहेत.  त्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाला 5 कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.