मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 जानेवारी 2023 (07:53 IST)

डायबिटीस व हायपर टेन्शनमुक्तीसाठी मुंबई महापालिकेने विशेष मोहीम

Navi Mumbai Municipal Corporation
मुंबईत तब्बल २५ लाख मुंबईकर हायपर टेन्शनचे शिकार आहेत. मुंबई हायपर टेन्शनमुक्त करण्यासाठी डायबिटीस व हायपर टेन्शनमुक्तीसाठी मुंबई महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली १० हजार आशा वर्कर ३० वर्षांवरील ५० लाख मुंबईकरांची तपासणी करणार आहेत. सोमवारपासून ही मोहीम सुरू करण्यात येणार असून, डायबिटीस व हायपर टेन्शनचे रुग्ण आढळल्यास योग्य ते औषधोपचार देणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी सांगितले. दरम्यान, या मोहिमेत गरोदर महिला व वयोवृद्धांची तपासणी करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
 
माया नगरी मुंबई कधी झोपतच नाही, हे नेहमीच बोलले जाते. घडाळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईने प्रत्येकाला आपल्या पोटात सामावून घेतले असून, धावपळीच्या जीवनात मुंबईकर आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले आहे. वेळेत न झोपणे वेळीअवेळी खाणे, व्यायामाकडे दुर्लक्ष आणि रस्त्यांवरील खाद्यपदार्थ खाणे यामुळे ३४ टक्के मुंबईकर हायपर टेन्शनचे शिकार असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार, पालिकेने पालिकेने पाच हजार जणांमध्ये हे ‘स्टेप’ सर्वेक्षण केले होते. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांचा ताणतणाव कमी करण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून विशेष मोहीम राबवली जाणार आहे. सुरुवातील ‘आशा’ वर्करच्या माध्यमातून घरोघरी जाऊन प्राथमिक तपासणी केली जाईल. यावर ‘बीएमएस’ डॉक्टरच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येईल, तर सर्वेक्षणात आढळणाऱ्या संशयितांवर डॉक्टर, पालिकेचे दवाखाने आणि आवश्यकता भासल्यास मोठ्या रुग्णालयांच्या माध्यमातून औषधोपचार करण्यात येणार आहेत. या उपक्रमात आरोग्य केंद्रांमध्ये विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी सांगितले.
Edited by : Ratnadeep Ranshoor