शनिवार, 25 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 24 जून 2020 (16:04 IST)

मनसेच्या इशाऱ्यानंतर टी -सिरिजकडून माफी मागणारे पत्र सादर

t series
मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर ‘टी-सिरीज’ने जाहीर माफी मागितली आहे. पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम याचं गाण युट्यूबला अपलोड केले होते. त्यानंतर  खोपकर यांनी फेसबुकच्या माध्यमातून गाणं तात्काळ हटवण्याची मागणी करत टी-सिरीजचे मालक भूषण कुमार यांना इशारा दिला होता. “भूषण कुमार तू याला धमकी समज, पण जर तू या गोष्टी बंद केल्या नाहीस तर तुला खूप महागात पडेल,”अशा शब्दांत अमेय खोपकर यांनी इशारा दिला होता.
 
यानंतर टी-सीरिजने जाहीर माफी मागितली आहे. टी-सिरिजकडून माफी मागणारं पत्र पाठवण्यात आलेलं असून मनसेने ट्विटरवर शेअर केलं आहे. “हे गाणं आमच्या प्रमोशन टीमच्या एका कर्मचाऱ्याने टी-सीरिजच्या युट्यूब चॅनेलवर रिलीज केलं होतं. त्याला माहिती नसल्याने ही चूक झाली. याबद्दल आम्ही माफी मागतो आणि यापुढे हे गाणं टी-सीरिजच्या युट्यूब चॅनेलवर रिलीज किंवा प्रमोट करणार नाही अशी खात्री देतो,”अशी हमी टी-सीरिजने दिली आहे. या पत्रात त्यांनी यापुढे पाकिस्तानी कलाकारांना कोणत्याही बाबींमध्ये सहाय्य करणार नाही याची खात्रीही दिली आहे.