मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 3 सप्टेंबर 2023 (16:48 IST)

Thane: पत्नीची गोळ्या झाडून हत्या, नंतर पतीला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू

death
महाराष्ट्रातील ठाणे शहरात एका 56 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर लवकरच तो देखील कोसळला आणि हृदयविकाराच्या झटक्याने. त्याचा मृत्यू झाला,सदर घटना कळव्यातील कुंभार अली येथील यशवंत निवास इमारतीत शुक्रवारी रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास घडल्याचे पोलिसांनी शनिवारी सांगितले. दिलीप साळवी आणि त्यांची 51 वर्षीय पत्नी प्रमिला अशी मृतांची नावे आहेत.
 
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री दिलीप साळवी घरी परत आल्यावर त्याच्यात आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद सुरू झाला. रागाच्या भरात त्याने रिव्हॉल्वर काढून पत्नीवर दोन गोळ्या झाडल्या, त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.
 
त्या नंतर तो खाली कोसळला आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. साळवी यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, साळवी यांनी रिव्हॉल्व्हर त्यांच्या पत्नीकडे दाखवले तेव्हा तिने गजर केला आणि मुलाला बोलावले,पण तो  घटनास्थळी पोहोचे पर्यंत ती  मरण पावली होती. हत्येमागील नेमका हेतू काय, याचा तपास पोलीस करत आहेत. 
 





Edited by - Priya Dixit