शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 फेब्रुवारी 2024 (09:38 IST)

ठाकरे सरकारने परवानगी दिली असती तर देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पात आतापर्यंत बरीच प्रगती झाली असती-अश्विनी वैष्णव

Ashwini Vaishnav
मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड बुलेट ट्रेनचा (MAHSR कॉरिडॉर) बिलीमोरा ते सूरत हा पहिला विभाग 2026 पर्यंत तयार होईल, अशी घोषणा केली. ती पूर्ण झाल्यावर, बिलीमोरा-सुरत मार्गावर शिंकनसेन ट्रेनच्या E5 मालिकेचा वापर करून चाचण्या घेतल्या जातील. गुजरातमध्ये याआधीच 250 किमीपेक्षा जास्त गर्डर्स लाँच करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र हे सांगत असतानाच त्यांनी तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला. ठाकरे सरकारने लवकर परवानगी दिली असती तर देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पात आतापर्यंत बरीच प्रगती झाली असती, असे त्यांनी अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.
 
विक्रोळी शाफ्ट येथे बोगद्याच्या कामासाठी अश्विनी वैष्णव यांनी पहिला रिमोट-नियंत्रित स्फोट घडवून आणला आणि बोगद्याच्या कामाची सुरुवात झाली. मात्र, यावेळी ते 508 किलोमीटरचा मार्ग पूर्ण करण्यासाठी निश्चित कालावधी सांगण्यास टाळाटाळ करताना दिसले. त्यांनी नमूद केले की, भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला मागील उद्धव ठाकरे सरकारच्या हस्तक्षेपामुळे विलंब झाला. उद्धव ठाकरे सरकारने हा प्रकल्प थांबवला नसता तर आतापर्यंत महाराष्ट्रात बरीच कामे पूर्ण झाली असती. मात्र आता राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (शिवसेना-भाजप) सरकार स्थापन होताच 10 दिवसांत परवानग्या देण्यात आल्या आहेत.

Edited By - Ratnadeep Ranshoor