रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (21:13 IST)

सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी आता 1 नोव्हेंबर

court
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी आता 1 नोव्हेंबर रोजी होणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये न्यायालयाच्या कामकाजामध्ये अनेक सुट्ट्या असल्याने सुनावणी महिनाभर पुढे ढकलली आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यामध्ये न्यायालयाच्या कामकाजामध्ये अनेक सुट्ट्या आहेत. नवरात्रीची 9 दिवसांची सुट्टी आहे. तसेच, त्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज पुढे ढकलण्यात आले आहे.
 
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर मंगळवारी महत्त्वाची सुनावणी झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला पक्षचिन्हावर निर्णय घेण्याची मुभा दिली. परंतु, अनेक मुद्द्यांवरची याचिका अजूनही न्यायालयात प्रलंबित आहे.
 
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षासंबंधी दहा मुद्द्यांवर सुनावणी होणार आहे. राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी ही सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुरु आहे. आता या सुनावणीची पुढची तारीख 1 नोव्हेंबर रोजी आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षासंबंधी दहा मुद्द्यांवर न्यायालय काय निर्णय घेणार हे 1 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.