शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (15:33 IST)

बाबासाहेब पुरंदरे यांची एकमेव आठवण धूळखात,मनसे आक्रमक

दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांनी दिलेल्या शिवकालीन शस्त्रांचे राज्यातील एकमेव संग्रहालय हे नाशिकमध्ये उभारण्यात आले आहे. मात्र या शस्त्र संग्रहालयाची दयनीय अवस्था झाली आहे,आज मनसेच्या वतीने या शस्त्र संग्रहालयाची साफसफाई करण्यात आली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून हे संग्रहालय नाशिकच्या गंगापूररोड परिसरात उभारण्यात आले आहे.स्वतः स्वर्गवासी बाबासाहेब पुरंदरे यांनी दिलेल्या शिवकालीन शस्त्रसाठ्या नंतर या बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयाचे उदघाटन करण्यात आले होते.या ठिकाणी अनेक शिवकालीन शस्त्र हे ठेवण्यात आले आहे.तर नागरिकांना देखील हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अमूल्य ठेवा पाहता यावा यासाठी हे शस्त्र संग्रहालय उभारण्यात आले होते,मात्र आता या शस्त्र संग्रहालयाची मोठी दयनीय अवस्था होऊन हे शस्त्र संग्रहालय बंद अवस्थेत पडले आहे.
 मनसे पदाधिकारी यांनी या शिवकालीन शस्त्र संग्रहालयाची हातात झाडू घेऊन साफसफाई केली.या संग्रहालयाची इतकी दयनीय अवस्था झाली आहे की, वीजबिल थकल्याने येथील वीज कनेक्शन देखील बंद करण्यात आले आहे.महापालिकेडून हे वीज बिल भरणं अपेक्षित असतांना हे वीजबिल अद्याप न भरल्याने सदर शस्त्र संग्रहालय अंधाराच्या विळख्यात सापडले आहे.मनसेकडून या संग्रहालयाची निर्मिती करण्यात आल्याने सत्ताधारी भाजपच याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी मनसे पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आला आहे.त्यामुळे राजकरण बाजूला ठेऊन या अमूल्य ठेव्याचे जतन जर केले तर नक्कीच आजच्या आणि पुढच्या पिढीला शिवकालीन शस्त्रांची माहिती मिळून शिवाजी महाराज यांच्या बद्दलचे प्रेम, त्याचे विचार ,हे प्रत्येक पिढीच्या मनामनात पोहचवण्यासाठी मदत होईल हे मात्र नक्की.त्यामुळे येत्याकाळात या शस्त्र संग्रहालयाची झालेली दयनीय अवस्था निटनेटकी होऊन नाशिककरांना ही वास्तू पाहण्यासाठी पुन्हा खुली करण्यात येईल हीच अपेक्षा केली जात आहे.