शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 फेब्रुवारी 2021 (09:02 IST)

'या' ऑडिओ क्लीपमधील आवाज माझा नाही : टोपे

आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांच्या नावाने सोशल मीडियात एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. मात्र, या ऑडिओ क्लीपमधील आवाज माझा नसल्याचे राजेश टोपे यांनी ट्विटरवरुन सांगितले आहे.  
 
राजेश टोपे यांच्या नावाने व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लीपमधील व्यक्ती, मास्क न घालणाऱ्यावर कारवाई व दंड करण्याच्या सूचना देत आहे. तसेच, मंगल कार्यालय आणि कोचिंग क्लासेसवरही नियमांचे पालन होत नसेल तर कारवाई करा. दुसऱ्यांदाही तसेच आढळून आल्यानंतर ते कार्यालय व क्लासेस सील करा, अशा सूचना या आवाजातील व्यक्ती देत आहे. एकंदरीत 6 मिनिटांची ही ऑडिओ क्लीप असून यामध्ये स्थानिक प्रशासनालाही सूचना दिल्याचे दिसून येत आहे. मात्र, या व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लीपमधील आवाज माझा नसल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.